July 16, 2025 1:08 PM

views 23

लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन

लोकमान्य टिळक यांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.    दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , आणि एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.