September 26, 2024 7:00 PM

views 16

राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. ओरोस इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.    राजकोट इथं शिव छत्रपतींचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारणार येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येणार असून या दोन्हीसाठी एकूण १०० कोटी खर्च प्रस्तावित असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळा सहा महिन्यात तर शिवसृष्टीच काम एका वर्षात पूर्ण होईल ...

August 27, 2024 1:48 PM

views 21

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर

महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या  पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांवर अन्याय टाळण्य...

August 20, 2024 3:33 PM

views 30

शाळांमध्ये विशाखा समित्या बंधनकारक होणार

मुलींच्या सुरक्षेसाठी राज्यात सर्व शाळांमध्ये विशाखा समित्या स्थापन करणं बंधनकारक करण्याचे आदेश आजच जारी करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बदलापूर येथील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली. याबाबतची तक्रार दिल्यानंतरही जवळपास बारा तास कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

July 8, 2024 12:46 PM

views 23

पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त जलपंप उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून  त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर ते बोलत होते.    मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व श...