October 13, 2024 4:00 PM

views 46

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर बाबा यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पथकानं घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.   या घटनेच्या पार्श...

October 11, 2024 10:00 AM

views 24

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांना काल भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी काल सकाळी टाटा यांचं पार्थिव शरीर एन सी पी ए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.   उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद ...

October 9, 2024 9:52 AM

views 15

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू , दोन गंभीर जखमी

नांदेड शहरासह जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कंधार तालुक्यात मसलगा इथं एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. छत्रपती संभाजीनगर परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात लातूर, नांदेड, जालना आणि बीड शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

September 28, 2024 2:18 PM

views 20

दिग्गज ब्रिटीश अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं निधन

दिग्गज ब्रिटीश अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी लंडन इथं निधन झालं. हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमातली प्रोफेसर मिनर्व्हा मॅक्गोनागल ही त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. स्मिथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ५० हून अधिक चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका केल्या. १९६९ मधील ‘दि प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’ आणि १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कॅलिफोर्निया सूट’ या सिनेमांसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

September 15, 2024 2:56 PM

views 13

मेरठ इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या झाकीर कॉलनीत काल इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर सुरु केलेलं मदत कार्य आज सकाळी पूर्ण झालं. आज या ढिगाऱ्यातून ५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी हे मदतकार्य केलं.  ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत १५ जण होते. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मिना यांनी दिली.  या अपघातातली मृतांची संख्या आता १० झाली आहे.