November 30, 2025 8:00 PM

views 14

हाँगकाँगमध्ये एका संकुलातल्या इमारतीमध्ये आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १४६वर

हाँगकाँगमध्ये एका संकुलातल्या इमारतीमध्ये आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १४६वर पोचली आहे. दुर्घटनेच्या आजच्या पाचव्या दिवशीही शोधकार्य पूर्ण झालेलं नसल्याने दीडशे जणांचा अजून पत्ता लागलेला नाही. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ज्वालाग्राही तसंच कमी दर्जाचा माल वापरल्याप्रकरणी आठ जणांना हाँगकाँगच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाने अटक केली आहे. हाँगकाँगमध्ये या दुर्घटनेनिमित्त तीन दिवसांचा दुखवटा पाळला.