December 9, 2025 9:41 AM

views 144

श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इथं ठेवण्यात येईल. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.   बाबा आढाव यांनी शेतमजूर, हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. हमाल पंचायत या संघट...

August 18, 2025 1:45 PM

views 53

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर पोहोचली आहे. काल चंबा आणि कांगरा जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती संचालन केंद्रानं दिली. दरडी आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यभरातले जवळपास ४०० रस्ते बंद आहेत.

July 14, 2025 12:43 PM

views 17

नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांच्या निधन

नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांच्या निधनाबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बुहारी दोन्ही देशांमधील मैत्री दृढ राखण्यासाठी ते वचनबद्ध होते, असं सांगत बुहारी यांच्याशी झालेल्या भेटी, त्यांच्याशी झालेल्या चर्चांच्या आठवणींना प्रधानमंत्र्यांनी उजाळा दिला आहे. बुहारी यांचे कुटुंब, नायजेरियन जनतेप्रती सहवेदनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

April 26, 2025 1:30 PM

views 27

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज आज रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार होत आहे. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी रोममध्ये जमले आहेत. भारताचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हेसुद्धा यावेळी उपस्थित असतील.   त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशात आज दुखवटा पाळला जात आहे. सर्व शासकीय इमारतींवरचा राष्ट्रध्वज अर्ध्य...

April 25, 2025 3:27 PM

views 25

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचं निधन

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचं आज बेंगळुरू इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. ते १९९४पासून २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. कस्तुरीरंगन यांनी पीएसएलव्हीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.तसंच, त्यांच्या कार्यकाळात चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांचं नियोजन करण्याची सुरुवात झाली होती.   निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी क...

March 22, 2025 2:49 PM

views 19

जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन

     जगप्रसिद्ध  मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल रात्री निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. बॉक्सिंग रिंगमधले ‘बिग जॉर्ज’ म्हणून ओळखले जाणारे, फोरमन, यांची कारकीर्द बॉक्सिंग इतिहासातली सर्वात अतुलनीय आणि दिर्घ काळाची ठरली.   १९६८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकून त्यांनी जागतिक पटलावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. त्यानंतर ७० च्या दशकात आणि १९९४ मध्ये असं दोनदा ‘हेवीवेट’ जागतिक अजिंक्यपद जिंकलं. तसंच वयाच्या ४५ व्या वर्षी ते जगातले सर्वाधिक वयाचे ‘हेवीवेट चॅम्पियन’ ठरले.    फोरमन ...

February 15, 2025 1:31 PM

views 42

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं निधन

प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं आज कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी गीतं कोणत्याही वाद्यांशिवाय गाण्यात त्यांचा हातखंडा होता.   अमी बांग्ला गण गाई आणि डिंगा भाषाओ सागोर ही त्यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली गाणी  विशेष गाजली. त्यांच्या निधनानं संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

February 15, 2025 10:25 AM

views 45

ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन

पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं काल डेहराडून इथं निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. सर्वोदयी कार्यकर्त्या असलेल्या विमला बहुगुणा यांनी 1953 ते 1955 दरम्यान बिहारमधे झालेल्या भूदान चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता.   ग्रामीण भागातल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच महिलांना स्वावलंबी करण्याचं कार्य त्यांनी केलं. चिपको आंदोनलाचे नेते सुंदरलाल बहुगुणा हे त्यांचे पती होते.

January 9, 2025 1:50 PM

views 29

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. साहित्यविश्वातल्या योगदानासाठी त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ते राज्यसभेचे खासदारही होते. १९९०च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रितीश नंदी शो’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते करत असत.   ‘प्रितीश नंदी कम्युनिकेशन्स’ या कंपनीद्वारे त्यांनी २०००च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. इंग्रजीत लेखन, तसंच बंगाली, उर्दू आणि पंजाबी कवितांचं इंग्रजीत भाषांतरही प्रितीश नंदी यांनी के...

November 3, 2024 4:12 PM

views 33

आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं निधन

गडचिरोली जि्ल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   हरिराम वरखडे हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे १९९२ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रव...