February 6, 2025 5:10 PM February 6, 2025 5:10 PM

views 3

CLAT २०२५ परीक्षेच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाखल

CLAT २०२५ अर्थात विधी अभ्यासक्रम सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यामूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठाने हा निर्णय दिला. यावर पुढची सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे. पदवीपूर्व परीक्षेतले अनेक प्रश्न चुकीचे असल्याबद्दल देशातल्या अनेक उच्च न्यायालयांमधे याचिका दाखल झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला.