July 15, 2024 3:35 PM July 15, 2024 3:35 PM

views 9

DD-Robocon India 2024 स्पर्धेत निरमा विद्यापीठ विजयी

प्रसारभारती आणि भारतीय तंत्रशिक्षण संस्था दिल्ली यांच्या वतीनं आयेजित DD-Robocon India 2024 ही स्पर्धा निरमा विद्यापीठानं जिंकली आहे. या स्पर्धेत पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रथम उपविजेते, तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठानं दुसऱ्या उप-विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.   दोन दिवस नवी दिल्लीतील त्यागराज मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विजेता संघ आता व्हिएतनाममधील क्वांगनिन्ह इथं आंतरराष्ट्रीय आशिया-प्रशांत प्रसारण संघटनेच्या 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. 45 महाव...

July 13, 2024 1:38 PM July 13, 2024 1:38 PM

views 16

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं ‘DD-Robocon’ India 2024 चं आयोजन

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्यावतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर 'DD-Robocon' India २०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली ४५ हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.डीडी-रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील क्वांगनिन्ह इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन २०२४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.