February 28, 2025 3:55 PM February 28, 2025 3:55 PM
4
वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं, हीच मराठीची सेवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्या वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं, हीच खऱ्या अर्थानं माय मराठीची सेवा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा काल मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं पार पडला. त्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटीबद्ध असून, त्यासाठी निधीची...