December 13, 2024 7:06 PM December 13, 2024 7:06 PM

views 17

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्र्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांवर दिली.

October 15, 2024 7:09 PM October 15, 2024 7:09 PM

views 11

राज्य सरकारने लोकोपयोगी काम केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन

ऐतिहासिक अर्थसंकल्प, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी अशा योजना आणि निर्णयाद्वारे राज्य सरकारने लोकोपयोगी काम केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्र...

September 6, 2024 6:42 PM September 6, 2024 6:42 PM

views 13

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी नागेपल्लीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

June 29, 2024 3:37 PM June 29, 2024 3:37 PM

views 17

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता. मात्र, अध्यक्षांनी स्थगन फेटाळल्यानंतरही सभागृहात यासंदर्भात पवार यांनी निवेदन दिलं. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालकांना परवान...

June 29, 2024 9:26 AM June 29, 2024 9:26 AM

views 16

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये; तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये अपेक्षित आहे. महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये, राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये आहे. विधानपरिषदेत अर्थराज्यम...

June 25, 2024 7:23 PM June 25, 2024 7:23 PM

views 13

‘दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा’

राज्यात दरड कोसळल्यानं किंवा भूस्खलनानं गाडल्या गेलेल्या गावातल्या बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, आणि गावातल्या बाधितांना न्याय मिळणार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित गावांना विशेष निधी देण्याचा तर सातारा जिल्ह्यातल्या तारळी प्रकल्पग्रस्तांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.   यवतमाळ जिल्ह्यातलं अमडापूर आणि बीड जिल्ह्यातल्या ...