March 26, 2025 9:23 AM March 26, 2025 9:23 AM

views 16

दूध भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’, कारवाईसाठी कायद्यात सुधारणा

दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणाऱ्या भेसळीची बाब गंभीर असून, अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या सुधारणांसंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी काल दिले. दूध भेसळीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.   दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा तातडीनं सुरू करावी, पनीरमध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शन...

March 24, 2025 3:04 PM March 24, 2025 3:04 PM

views 9

कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये-अजित पवार

औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही. तसंच कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये, असं त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं.

March 23, 2025 7:35 PM March 23, 2025 7:35 PM

views 6

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू-अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथं दिलं. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट करत राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  

February 21, 2025 7:48 PM February 21, 2025 7:48 PM

views 11

मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीतं ते बोलत होते.  क्रीडा विभागामार्फत ही तिन्ही मैदानं खेळांच्या क्लबला भाडेपट्टा करारानं देण्यात येतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धो...

January 19, 2025 7:07 PM January 19, 2025 7:07 PM

views 8

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय असून त्यापासून तसूभरही मागं हटायचं नाही, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शिर्डी इथं पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या समारोप सत्रात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे, हे कृतीतून दिसावं, हा पक्ष नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा आहे, हे ठसवण्यासाठी काम करा, असा सल्लाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

January 14, 2025 8:55 PM January 14, 2025 8:55 PM

views 9

आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथल्या आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिल्यानंतर ताबडतोब त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १ कोटी ८६ लाख रुपये तर, “आनंद अंध, मुकबधीर” आणि “संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळे”साठी  १ कोटी २२ लाख रुपये, अशा निधीचा समावेश आहे. 

January 9, 2025 7:02 PM January 9, 2025 7:02 PM

views 5

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीन स्तरावर चौकशी सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, तीन स्तरावर चौकशी सुरू असून, जे कुणी दोषी असतील, त्यांना सोडलं जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बातमीदारांशी बोलत होते.    या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरचं कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर पक्ष न बघता, कारवाई करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, मात्र पुरावे नसतांना कोणावरही, आरोप करणं योग्य नाही, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर ते त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत, असं अजित पवार म्हणाले. त्यां...

December 22, 2024 7:11 PM December 22, 2024 7:11 PM

views 10

पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका

राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं सांगून बारामतीच्या वि...

December 19, 2024 8:56 AM December 19, 2024 8:56 AM

views 19

व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या तीन आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्हीही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते काल विधानसभेत बोलत होते. यासंदर्भातली विवादित रक्कम ५४ हजार कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान, काल विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयक, वस्तू आणि सेवा कायदा दुरुस्ती, मुद्रांक शुल्क वाढ विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं.

December 15, 2024 7:28 PM December 15, 2024 7:28 PM

views 13

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर महामंडळाची पदं तात्काळ भरली जातील,  असं ते म्हणाले.    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.