December 13, 2025 3:01 PM December 13, 2025 3:01 PM

views 8

स्वायत्त संस्थांच्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्वं निश्चित करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांद्वारे अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणली जाईल तसंच योग्य निकषांसह मार्गदर्शक तत्वे निश्चित केली जातील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. या संस्थांची शिष्यवृत्ती ३ वर्षांपासून रखडली असल्याचा प्रश्न डॉ. नितीन राऊत यांनी विचारला होता, त्यावर ते बोलत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित घटकांतल्या, परदेशात शिक्षण घेण्याची क्षमता नसलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्राधान्यानं मदत करण्याचा ...

November 3, 2025 3:31 PM November 3, 2025 3:31 PM

views 25

वैद्यकीय महाविद्यालय आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकारचं प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. औंंध इथं बहुउद्देशीय दंंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि औंधचं जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, त्यावेळी पवार बोलत होते. हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे असे सांगून सर्वसामान्य नागरिकांना  माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा ...

September 30, 2025 6:59 PM September 30, 2025 6:59 PM

views 28

सर्पदंशावर हाफकिननं तयार केलेल्या लशीची खरेदी MMGPA नं करावी- अजित पवार

सर्पदंशावर हाफकिन संस्थेनं तयार केलेली लस प्रभावी आणि परिणामकारक असून यध्या हाफकिनकडे या लशीच्या दीड लाख मात्रा तयार आहेत, त्यांची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं करावी, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.    केंद्र सरकारकडून पोलिओ लशीच्या २६ कोटी ८० लाख मात्रांची मागणी आहे. या लशीची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकि...

September 26, 2025 7:00 PM September 26, 2025 7:00 PM

views 16

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून भरीव मदत देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिल्याचंही पवार यावेळी म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपये आर्थिक मदत आणि १० किलो धान्य दिलं जाणार आहे. गरजेनुसार, धान्याची मदत वाढवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी वार्ताहरांना दिली.

July 2, 2025 3:07 PM July 2, 2025 3:07 PM

views 16

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. राज्याच्या विकासाची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत दर्जेदार पणे पूर्ण व्हावीत यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला विविध विभागांचे सचिव ...

May 20, 2025 8:49 AM May 20, 2025 8:49 AM

views 7

खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाचं चित्र बदलण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.   श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरु असलेल्या कामांचाही पवार यांनी आढावा घेतला. या कामासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्ताप...

May 15, 2025 7:31 PM May 15, 2025 7:31 PM

views 13

बाजारांचा विकास करताना शेतकऱ्यांचं हित, अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय नामांकित बाजाराच्या अनुषंगानं राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित, तसंच बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भात विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पवार यांनी दिले.    कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाबाबतही आज अजीत पवार यांच...

May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM

views 22

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात शेती, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला एआयचा वापर, याकरता राज्य शासनानं मायक्रोसॉफ्ट उद्योगाबरोबर करार केला आहे, त्याअंतर्गत बारामती इथं आयटीपार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याबाबत आज मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. त्यादृष्टीनं कुशल मनुष्यबळ मि...

April 2, 2025 7:49 PM April 2, 2025 7:49 PM

views 4

बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड जिल्ह्यातून होणार स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बीड दौऱ्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. चूक करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही हस्तक्षेपाची पर्वा न करता कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

March 27, 2025 7:05 PM March 27, 2025 7:05 PM

views 12

कोल्हापुरात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकासकामं सुरू असून त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या प्रमुख विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत बोलत होते.