January 23, 2025 1:30 PM January 23, 2025 1:30 PM
13
दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा करार एमएसएन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून, त्यात राज्याच्या 'अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट' उपक्रमांतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प...