July 24, 2024 2:54 PM

views 22

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं भारतात आगमन

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं आज भारतात आगमन झालं. मंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच औपचारिक दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लॅमी यांचं स्वागत केलं. या दौऱ्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होईल, असा विश्वास जयस्वाल यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.