December 11, 2025 3:43 PM December 11, 2025 3:43 PM

views 4

राज्यात एकही शेतकरी लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांना शेततळी, अवजार खरेदी आणि इतर गरजांच्या मदतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत दिली.   गेल्या ४ वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे ४८ लाख अर्ज कारवाईविना पडून असल्याबाबत रणजीतसिंग मोहिते पाटील, संजय खोडके, शशिकांत शिंदे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. कृषी समृद्धी योजनेसाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने...

October 11, 2025 7:12 PM October 11, 2025 7:12 PM

views 32

राज्यातल्या ९ जिल्ह्यांसह देशातल्या १०० जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात

राज्यात पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे. त्यामुळे हरभरा, मूग, तूर, उडीद, मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे, असं कृषीमंत्री म्हणाले. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रीय खताचा वापर करा...

September 30, 2025 6:54 PM September 30, 2025 6:54 PM

views 52

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    राज्यातल्या ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. येत्या १० दिवसात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या धर्तीवर जी सवलत दिली जाते ती सर्व सवलत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. पंचनामे करण्याचं काम युद...