March 20, 2025 6:59 PM March 20, 2025 6:59 PM
13
नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खान याच्यासह ६ जणांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर दंगलींचा सूत्रधार फहीम खान याच्यासह ६ जणांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फेसबुक, एक्स, यू ट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवरच्या सुमारे २३० प्रक्षोभक पोस्ट आढळल्या आहेत, असं सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. परिस्थितीचा आढावा घेऊन नंदनवन, आणि कपिलनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतली संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे. तर लकडगंज, पाचपावली, श...