October 1, 2024 2:55 PM October 1, 2024 2:55 PM

views 4

आयआयटी धनबाद इथं प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले निर्देश

आयआयटी धनबाद इथं प्रवेश शुल्क भरायला काही मिनिटं उशीर झाला म्हणून प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या प्रकरणी काल सुनावणी झाली. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश द्यावा, तसंच सर्व सुविधा द्याव्यात असं न्यायालयाने सांगितल...