August 13, 2025 3:03 PM August 13, 2025 3:03 PM
6
वसई विरार महानगर पालिकेने ६ हजार ६५२ गोविंदांचा काढला विमा
दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसई विरार महानगर पालिकेने ६ हजार ६५२ गोविंदांचा विमा काढला आहे. विमा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून ते १७ ऑगस्टपर्यंत हा विमा लागू असेल. विम्याचं संरक्षण मिळालं असलं तरी उत्सवाच्या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, दुखापत होऊ नये याची दक्षता घेण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.