December 6, 2025 8:21 PM December 6, 2025 8:21 PM

views 99

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.  बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व न्याय, समता आणि संविधानाच्या तत्वांवरची त्यांची निष्ठा भारताच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली आहे, ...

November 15, 2024 7:35 PM November 15, 2024 7:35 PM

views 16

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या विधानसभा निवडणुकीतील प्रधानमंत्र्याची ही राज्यातील शेवटची प्रचारसभा होती. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्या...