April 22, 2025 9:00 PM April 22, 2025 9:00 PM
10
पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य ऐवजी ऐच्छिक-दादाजी भूसे
राज्यातल्या पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करुन लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणात ३ भाषा धोरण सुचवलं आहे. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे पण यासाठी केंद्राची सक्ती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुकाणू समिती, राज्यभरातले तज्ञ, विविध शिक्षण तज्ञ यांच्याशी चर्चा...