January 23, 2025 3:06 PM January 23, 2025 3:06 PM
6
कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात
कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याच्यासह सहा जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे. एका हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.