July 5, 2025 1:48 PM July 5, 2025 1:48 PM

views 12

सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं

क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो चा पराभव केला. १८ पैकी १४ गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉरमॅट मध्ये पहिलं स्थान पटकावलं. पोलंडचा जान क्रिजस्टोफ दुडा दुसऱ्या स्थानावर असून माजी विश्वविजेता नॉवेचा मॅग्नस कार्लसन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा प्रज्ञानंद देखील या स्पर्धेत सहभागी असून तो फॅबियानो कारुआनासमवेत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.  या स्पर्धेचा ब्लिट्झ ...

June 6, 2025 3:45 PM June 6, 2025 3:45 PM

views 6

नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विजयी

भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत आपला चौथा विजय मिळवला. गुकेशनं क्लासिकल स्पर्धा प्रकाराच्या नवव्या फेरीत चीनच्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह गुकेश आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात केवळ आता अर्ध्या गुणाचे अंतर आहे. स्पर्धेत आता शेवटची फेरी बाकी आहे.

December 18, 2024 11:10 AM December 18, 2024 11:10 AM

views 8

फिडे वर्ल्ड रॅपिड अँड बिल्टझ अजिंक्यपद स्पर्धेतून विश्वविजेता डी. गुकेशची माघार

विश्वविजेता डी. गुकेशनं आगामी फिडे वर्ल्ड रॅपिड अँड बिल्टझ अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत अर्जुन इरिगाईसी आणि आर. प्रग्यानंद भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा येत्या 26 ते 31 डिसेंबर दरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

December 12, 2024 8:40 PM December 12, 2024 8:40 PM

views 26

फिडे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशची विश्वविजेतेपदाला गवसणी

फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.   त्याने त्याचा प्रतिस्पर्धी चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा या १४ व्या फेरीअखेर पराभव केला. या अंतिम सामन्याच्या पहिल्या १३ फेऱ्या बरोबरीत सुटल्या होत्या.   या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुकेशचं अभिनंदन केलं. या यशामुळं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारत एक शक्तिके...

December 9, 2024 10:04 AM December 9, 2024 10:04 AM

views 9

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याची ११व्या फेरीत आघाडी

फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश यानं ६-५ अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ११ व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडीत केली असून त्याच्या जगज्जेतेपदाची शक्यता आणखी वाढली आहे. या स्पर्धेतल्या तीन फेऱ्या होणं बाकी आहे.

December 4, 2024 2:26 PM December 4, 2024 2:26 PM

views 6

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश चा सामना चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार

सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याचा सामना आज दुपारी चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार आहे. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हा सामना सुरू होईल. ही या स्पर्धेची आठवी फेरी आहे. काल गुकेश आणि डिंग यांच्यात झालेला सातव्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता.