October 30, 2025 8:04 PM October 30, 2025 8:04 PM

views 29

मोंथा चक्रीवादळामुळे पिकांचं प्रचंड नुकसान

मोंथा चक्रीवादळामुळे तेलंगणाच्या अर्ध्या भागात प्रचंड नुकसान केलं आहे. कापणीला आलेला भात आणि कापूस खरेदीच्या हंगामात पिकांचं नुकसान झालं आहे. नलगोंडा ते करीमनगरपर्यंत मुसळधार पावसाने हजारो एकरवरची भातपिकं जमीनदोस्त झाली आहेत. वारंगल, खम्मम आणि नलगोंडा या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. नलगोंडा, वारंगल, हनमकोंडा, महबुबाबाद, निजामाबाद या जिल्ह्यांमध्येही भातपिकासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागात रस्ते आणि रेल्वे सेवेला ...

October 30, 2025 2:54 PM October 30, 2025 2:54 PM

views 54

मोंथा चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस

मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आंध्रप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे.   महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.    झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात तापमानात घट झाली असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आणखी चार दिवस या वादळाचा प्रभाव कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.    कोकण, गोवा, आंध्र प्रदेश...

October 29, 2025 1:40 PM October 29, 2025 1:40 PM

views 361

मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं, वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमधे मुसळधार पाऊस

मोंथा चक्रीवादळ काल रात्री ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनाऱ्यावरून मछलीपट्टणम आणि कलिंगपटणमच्या मधून पुढे सरकलं. किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम, विशाखापट्टण, नेल्लोर, काकिनाडा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं. कोनासीमा इथं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे ४८ हजार हेक्टरवरची पिकं आणि जवळपास दीड लाख हेक्टरवरच्या फळबागांना मोठा फ...

October 28, 2025 8:18 PM October 28, 2025 8:18 PM

views 28

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. चक्रीवादळामुळे ९० ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत आहे. तसंच आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे हवामान विभगानं आंध्र प्रदेशातल्या १९ जिल्ह्यांना अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबु नायडू आणि उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि प्रशासनाला वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागात मदत आ...