December 6, 2024 8:07 PM

views 16

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातर्फे मंत्र्यांचं एक पथक पाठवलं असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यांमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार नेहमीच राज्य सरकारांच्या पाठीशी उभं राहत असून यावर्षात आतापर्यंत केंद्र सरकारने विविध राज्यांना आपत्ती निवारणासाठी २१ हजार ७१८ कोटी रुपयांची मदत दिली आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आ...

December 1, 2024 2:56 PM

views 15

फेंजल चक्रीवादळाचा तमिळनाडु आणि पुदुच्चेरीला तडाखा

चक्री वादळ फेंजलने काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडक दिली. ताशी 90 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांसह तामिळनाडू आणि शेजारच्या पुद्दुचेरीमध्ये २० सेंटीमीटर्सपर्यंत पाऊस पडला. वीज अंगावर पडून काल तीन जणांचा मृत्यू झाला. पावसामुळं बस, रेल्वे आणि विमान सेवांसह सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असुरक्षित भागातील लोकांना अधिकाऱ्यांनी सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवलं आहे. भारतीय हवामान विभागानं तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश...

November 28, 2024 10:58 AM

views 15

फेंगल चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका

बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका बसला असून, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जण मृत्युमुखी पडले आहेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागात श्रीलंकेची नौदल आणि हवाई दलाची पथके मदतकार्य करत आहेत.