November 30, 2025 8:05 PM

views 58

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ वर

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ झाली असून २०३ जण अद्याप बेपत्ता आहेत.  भारतीय लष्करानंही ऑपरेशन सागर बंधू द्वारे बचाव कार्यात भाग घेतला आहे. श्रीलंकेच्या विविध पूरग्रस्त भागात वायुदलाची एमआय -१७ ही हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.  भारतीय वायुदलानं श्रीलंकेच्या कोटमाले भागातून पूरात अडकलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या २४ जणांना तातडीनं कोलबो इथल्या रुग्णालयात पोहोचवलं. आज सकाळी श्रीलंकेच्या लष्करानंही मदतशिबीर सुरु केलं आहे. भारताच्या राष्ट्रीय...