December 5, 2025 1:40 PM

views 27

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ४८६ जणांचा मृत्यू

श्रीलंकेत आलेल्या विनाशकारी दितवाह चक्रीवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४८६ वर पोहोचली असून अद्याप ३४१ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत १ लाख ७१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून देशभरात सुमारे बाराशे बचाव केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.  दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारत श्रीलंकेला विविध पातळ्यांवर मदत पोहोचवत आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्यानं  अडकलेल्या लोकांची सुटका करणं, औषधांचा पुरवठा आणि दळणवळण यंत्रणा पुनर्स्थापित करण्यासाठी भारत सातत्यानं मदत करत  आहे.

December 4, 2025 8:05 PM

views 19

दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न

श्रीलंकेत येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत तब्बल २१० ते ३२० अब्ज रुपयांचं नुकसान केलं असून ते त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्क्याएवढं आहे. इमारती, घरे, रस्ते, पुल आणि सार्वजनिक सेवा सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं असून अनेक भागातली शेती वाहून गेली आहे.

December 4, 2025 1:36 PM

views 21

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या ४७९ वर

 श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता ४७९ झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये साडेतीनशे लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संपर्क अद्याप तुटलेलाच असून काही भाग मदतीपासून वंचित आहेत.   दरम्यान, भारतानं ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून आवश्यक ती मदत सुरु ठेवली आहे. भारतीय वैद्यकीय पथक आणि तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी कर...

December 3, 2025 1:09 PM

views 25

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या जहाजातून पाठवलेली मदतसामग्री श्रीलंकेच्या वायुदलानं हवाईमार्गे पोहोचवली आहे.     भारतीय वायुदलानंही पूर्वेकडच्या प्रांतात अनेकांना आपल्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं आहे. एनडीआरएफची...

December 2, 2025 8:03 PM

views 29

दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान ४१० जणांचा मृत्यू, ३३६ जण अद्याप बेपत्ता

श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून विविध दुर्घटनांमध्ये ४१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच ३३६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती   श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं आज सकाळी  दिली. श्रीलंकेतल्या  २५ जिल्ह्यांमधल्या दीड कोटी लोकांना या चक्रीवादळाचा थेट फटका बसला असून कँडमध्ये सर्वाधिक ८८  तर बदुल्लामध्ये ८३ लोकांना जीव गमवावा लागला.    दरम्यान भारतीय सैन्यदलानं श्रीलंकेच्या नागरिकांच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू राबवलं आहे. या द्वार...

December 1, 2025 1:34 PM

views 59

दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर

दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं असून ते बंगालचा उपसागर आणि उत्तर तामिळनाडू तसंच पुद्दुचेरीच्या किनारी भागाकडे झुकलं आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ दहा किलोमीटर प्रती तासाच्या गतीने उत्तरेकडे सरकलं असून  ते चेन्नईपासून दक्षिणेकडे ९० किलोमीटर, पुद्दुचेरीपासून दक्षिणेकडे ९० किलोमीटर आणि कुड्डलोर आणि कराईकलपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीपासून समांतर अंतरावर तीस किलोमीटरवर असेल. यामुळे तिरूवलुर जिल्ह्यात आज जोर...

November 29, 2025 4:52 PM

views 35

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ६९ जणांचा मृत्यू, ३४ जण बेपत्ता

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा ६९ वर पोहोचला असून, ३४ जण अजूनही बेपत्ता आहेत.  तिथल्या दोन लाखापेक्षा जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या भागात ३०० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. परिणामी पूर, आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे या क्षेत्रातली वाहतूक, वीज पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा बाधीत झाल्या आहेत.

November 28, 2025 2:30 PM

views 44

दितवा चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दितवा चक्रीवादळ तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांकडे सरकत आहे. यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात १ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागांमध्ये, मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारी भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांत पुढील तीन दिवसांत जोरद...