October 25, 2024 8:03 PM October 25, 2024 8:03 PM

views 7

दाना चक्रीवादळामुळं ओडिशात जीवितहानी नाही, हजारो हेक्टरवरच्या भात पिकांचं नुकसान

दाना-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या  ओडिशातल्या  केंद्रपारा, भद्रक, बालासोर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या चक्रीवादळामुळे मानवी जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या भागातल्या  हजारो हेक्टर भातशेतीच्या  पिकांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात वीज तारा तुटल्या असून  मोठमोठी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.    एनडीआरएफ, ओडीआरएएफ, अग्निशमन सेवा, ऊर्जा आणि इतर विभागांचे कर्मचारी रस्ते  आणि वीजपुरवठा पूर्ववत क...

October 25, 2024 5:12 PM October 25, 2024 5:12 PM

views 2

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलं

दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवरील केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर इथं धडकल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे किनारपट्टीवरील भितर कनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा दरम्यान जोरदार वारे आणि पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरं आणि भातपिकांचं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येत्या ४ तासांत चक्रीवादळ कमकुवत होऊन खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल आणि उत्तर ओडिशा ओलांडेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. ओदिशाचे ...

October 24, 2024 2:46 PM October 24, 2024 2:46 PM

views 8

‘दाना’ चक्रिवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रिवादळ आज मध्यरात्री ओडिशा किनारपट्टीवरच्या भितरकनिका आणि धामरा या प्रदेशांदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दानाच्या भूभागावरचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असून उद्या पहाटेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. सध्या हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीपासून २४० किलोमीटर अंतरावर असून ते ताशी १२ किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या वादळामुळे ओडिशातील केंद्रपारा, बालासोर, मयूरभंज, जगतसिंगपूर आणि भद्रक या जिल्ह्यांत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यत...

October 22, 2024 8:33 PM October 22, 2024 8:33 PM

views 9

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं  ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.    ओदिशा किनारपट्टीवरच्या भितरकणिका आणि धामरा दरम्यान हे वादळ धडक देईल, असा अंदाज हवामानाच्या अनेक मॉडेल्सनं वर्तवला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.    वादळाच्य...