December 17, 2024 9:00 PM

views 21

फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये मेयोत इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्या दरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे. या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे, याचा निश्चित आकडा अद्याप कळू शकलेला नाही. सध्या संबंधित भागात बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका मोझांबिकला देखील बसला असून यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.    चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्...

December 17, 2024 10:14 AM

views 15

फ्रान्सच्या बेटाला चिडो चक्रीवादळाचा तडाखा

चिडो चक्रीवादळानं मादागास्कर आणि मोझांबिक किनाऱ्यादरम्यान असलेल्या मायोट या फ्रान्सच्या बेटाला जबरदस्त तडाखा दिला असून, इथं हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वीस लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असली, तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते बळींची संख्या एक हजार किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. ताशी 225 किमी वेगाने वारे असलेले आणि आठ मीटर उंचीच्या लाटांसह हे शक्तिशाली वादळ शनिवारी या भागात धडकलं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, वीजपुरवठा ...