October 26, 2025 1:55 PM

views 101

मोंथा चक्रीवादळआंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा जोर वाढत असून, ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मदत कार्याची तयारी सुरु केली आहे. किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची ८ आणि एसडीआरएफची ९ पथकं तैनात करण्यात आली आहेत. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला असून, येत्या बुधवारपर्यंत मासेमारी, नौकाविहार आणि किनारपट्टी भागातले सर्व प्रकारचे उपक्रम स्थगित करण्यात आले आहेत.  चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुडुचेरीमध...

October 4, 2025 8:11 PM

views 356

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ शक्तिशाली होण्याची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दरम्यान, समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे पुढचे काही दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

November 27, 2024 2:58 PM

views 22

तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसंच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढचे तीन दिवस बंगालच्या उपसागरात, तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. 

October 21, 2024 3:39 PM

views 19

बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आयएमडीचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आण...