March 23, 2025 3:09 PM March 23, 2025 3:09 PM

views 10

सायबर फसवणूक तक्रारीप्रकरणी दिवसभरात १ कोटी ४९ लाख रुपये जप्त

सायबर फसवणुकीसाठीच्या १९३० या हेल्पलाईनवर आलेल्या ११० तक्रारी २४ तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या ११० तक्रारी आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया थांबवली. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास नागरिकांनी या हेल्पलाईनवर तातडीनं मदत मागावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

January 27, 2025 1:29 PM January 27, 2025 1:29 PM

views 5

झारखंडमध्ये ६ सायबर गुन्हेगारांना अटक

झारखंडमधल्या जामतारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ सायबर गुन्हेगारांना अटक केली असून एक आंतरराज्य टोळी उघडकीस आणली आहे. सरकारी बँकांमधल्या खात्याच्या माहितीचा दुरुपयोग करून १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक या प्रकरणी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एहतेशाम वकारिब यांनी आज दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी या टोळीकडून १४ मोबाईल, २३ सीम कार्ड, १० एटीएम, १ लॅपटॉप, २ दुचाक्या, १ ड्रोन कॅमेरा यासह एक लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. 

January 23, 2025 9:18 PM January 23, 2025 9:18 PM

views 5

छत्तीसगड : सायबर फसवणूक प्रकरणी ६२ जणांना अटक

सायबर फसवणूक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवत ६२ जणांना अटक केली आहे. या मोहिमेत छत्तीसगड, राजस्थान आणि ओदिशा या राज्यांमधल्या सुमारे ४० ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. त्यात अटक केलेल्यांमधे नायजेरियाच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. ऑपरेशन सायबर शिल्ड या नावानं राबवलेल्या या मोहिमेत १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, असं रायपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितलं.