November 8, 2025 7:09 PM November 8, 2025 7:09 PM
38
नवी मुंबईत सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. यासाठी या टोळीनं देशभरातल्या विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरली होती. पोलिसांच्या कारवाईत ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुकं आणि एक चारचाकी असा १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.