October 3, 2025 9:11 PM

views 60

सायबर फसवणूक टाळण्यासाठी तातडीनं तक्रार देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. सध्या डिजिटल अटक, आर्थिक फसवणूक, सायबर बुलिंग अशा विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   सायबर गुन्ह्यांविषयी जनजाग...