January 15, 2025 6:50 PM

views 23

चलन बाजारात रुपया २८ पैशांनी वधारला

चलन बाजारात आज रुपया २८ पैशांनी वधारला. डॉलरच्या तुलनेत गेले काही दिवस सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयाचं मूल्य आज प्रति डॉलर ८६ रुपये ३६ पैसे असं झालं. अमेरिकेत भांडवली बाजारातली घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यानं डॉलर कमजोर झाल्याचं मानलं जात आहे.