June 8, 2025 7:55 PM June 8, 2025 7:55 PM
10
मणिपूरमधल्या पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
मणिपूरमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मैतेई समुदायाच्या अरंबाई टेंगगोल या कट्टरतावादी संघटनेच्या सदस्यांना झालेल्या अटकेनंतर या भागात हिंसक निदर्शनं झाली होती. त्यामुळे इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये आधी पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता संचारबंदी आणि जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या पाचही जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दलांची पथकं तैनात करण्यात आली आहे...