October 10, 2024 4:21 PM October 10, 2024 4:21 PM
7
देशाचे सांस्कृतिक दूत बना – केंदीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत
भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी आता युवकांनी देशाचे संस्कृतिदूत बनण्याची गरज असल्याचं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत डी वाय पाटील विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारतासाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात बोलत होते. युवा पिढी केवळ देशातल्या बदलाची साक्षीदार झाली नसून या बदलला कारणीभूत ठरली आहे असं ते म्हणाले.