December 10, 2024 7:07 PM

views 27

वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा फक्त संगणक आधारित चाचणी स्वरूपात

वर्ष २०२५ पासून  सामायिक  विद्यापीठ प्रवेश परीक्षा , फक्त   सी बी टी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येईल , अशी माहिती  विद्यापीठ  आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी आज बातमीदारांना दिली. विदयार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेसाठी निवडलेले   विषयच  या परीक्षेत घेण्याचं बंधन असणार नाही. या परीक्षेचा कालावधी एक तासाचा  राहील आणि सर्व प्रश्न अनिवार्य असतील.पूर्वीसारखे  पर्यायी प्रश्न दिले जाणार नाहीत.या अगोदर  ३७ विषयांच्या  परीक्षा  घेतल्या जात होत्या . आता ६३ विषयांच्या परीक्षा घेतल्या ज...

July 28, 2024 8:52 PM

views 23

CUET-UG सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

CUET-UG सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. उमेदवारांचे निकाल संबंधित विद्यापीठांना देण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांशी संपर्कात रहावं, असा सल्ला राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दिला आहे. १५ ते २९ मे दरम्यान देशभरातल्या २६ शहरांमधे झालेल्या या परीक्षेला १४ लाख ९९ हजाराहून जास्त विद्यार्थी बसले होते.

July 15, 2024 3:15 PM

views 26

CUET UG परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार

CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे.इच्छुक विद्यार्थ्यांना इ मेल द्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत.लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रं पाठवली जातील.परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या शंकांची संख्या लक्षात घेऊन उत्तरसूचीही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल,असं एनटीए नं सांगितलं.