March 8, 2025 8:31 PM March 8, 2025 8:31 PM

views 8

Women’s Day: मध्य रेल्वेनं संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं आज संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज सकाळी ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली. या गाडीत लोको पायलट, सहायक लोको पायलट, रेल्वेगाडी व्यवस्थापक, तिकीट तपासक, तसंच आहारसेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत. 

November 26, 2024 7:17 PM November 26, 2024 7:17 PM

views 8

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गावर व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली बसवली जाणार आहे. यात ९ जेट पंखे आणि अधिक क्षमतेचे मध्यवर्ती पंके बसवले जाणार आहेत. या प्रणालीची मदत आगीसारख्या घटना घडल्यावरही होणार आहे. भुयारात आग लागल्यावर मध्यवर्ती पंखे अधिक वेगानं फिरतील आणि धूर वेगानं बाहेर फेकला जाईल, असं प्रशासनानं सांगितलं.