November 21, 2025 5:14 PM November 21, 2025 5:14 PM
15
मुंबईत CSMI विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या आठवड्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये अंमली पदार्थ तसंच सोन्याची तस्करी पकडली आहे. एका कारवाईत २५ किलो ३१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारातली किंमत २५ कोटी इतकी आहे. या कारवाईत ७ जणांना अटक करण्यात आली. तर अन्य एका कारवाईत २६ किलो ९७१ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत २६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात ८ जणांना अटक करण्यात आली. तसंच, ६५ लाख ५७ हजार रुपये किमतीचं ५५१ ग्रॅम वजनाचं सोनंही जप्त...