September 30, 2024 1:15 PM September 30, 2024 1:15 PM

views 2

मुंबईत एम्प्रेस या पर्यटन जहाजावर ‘क्रूझ भारत’ अभियानाचा प्रारंभ

केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत एम्प्रेस या पर्यटन जहाजावर क्रूझ भारत या अभियानाचा प्रारंभ केला. भारताला जागतिक दर्जाचं समुद्रपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. यावेळी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, तसंच नवनिर्मिती धोरण, विविधता आणि सर्वसमावेशकता धोरणाचा आरंभही त्यांच्या हस्ते झाला. बंदरं, वाहतूक आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकुर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.