March 4, 2025 8:08 PM March 4, 2025 8:08 PM
16
ओपेकच्या नियोजित उत्पादन वाढीच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण
पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना-ओपेक च्या नियोजित उत्पादन वाढीच्या वृत्तानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलर ५७ सेंट प्रति बॅरल झाला आहे तर अमेरिकन क्रूडचा भाव ६७ डॉलर ५१ सेंट डॉलर प्रति बॅरल झाला आहे. ओपेक आणि रशियासारख्या तेल उत्पादक देशांनी एप्रिलमध्ये दररोज १ लाख ३८ हजार बॅरल इतकी तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.