August 7, 2025 1:23 PM August 7, 2025 1:23 PM
13
JammuKashmir : CRPF चा ट्रक दरीत कोसळून ३ जवान ठार, १५ जखमी
जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात ३ जवान ठार झाले असून इतर १५ जण जखमी झाले आहेत. या जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरुन खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जवानांची १८७ बटालियन बसंत घर इथली कारवाई करुन परतत असताना उधमपूर जिल्ह्यातल्या कांदवा इथं हा अपघात झाला. या वाहनात एकूण २३ जवान होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.