November 29, 2025 7:00 PM November 29, 2025 7:00 PM

views 39

केवळ सव्वा ३ लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळं...

November 21, 2025 2:47 PM November 21, 2025 2:47 PM

views 11

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभा पूर्वी  ते आज बातमीदारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं  नुकसान किंवा जंगली जनावरांमुळे शेतातल्या  पिकांचं  झालेलं नुकसान या दोन्ही बाबींमध्ये शेतकऱ्यांना पीकविम्यातून नुकसानभरपाई मिळू शकेल. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि देशातल्या  परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारनं हे दोन बदल ...

July 30, 2025 7:24 PM July 30, 2025 7:24 PM

views 19

पीक विम्यासाठी अर्ज करायची उद्या अंतिम मुदत

यंदाच्या खरीप आणि रबी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत केवळ ५५ हजार शेतकर्‍यांनी खरिपातल्या पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. ३१ जुलै ही पीक विम्याची अंतिम तारीख आहे. एका रुपयात पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीला आल्यानं ती बंद करण्यात आली  आहे. यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादनावर आधारित पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा, असं आवाहन पुणे  कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

August 24, 2024 6:54 PM August 24, 2024 6:54 PM

views 11

परभणीतल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीम्याचे पैसे आठवडाभरात देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आज दिले.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान २१ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर परभणीतल्या शेतकऱ्यांनी पिकविम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केंद्रीय तांत्रिक सल्...