December 3, 2025 3:20 PM December 3, 2025 3:20 PM

views 4

खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान

देशभरात यंदाच्या खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे साडे ७५ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पीकांचा यात समावेश आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.