October 12, 2025 7:35 PM October 12, 2025 7:35 PM

views 44

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांच्या सुरक्षिततेवरून केलेल्या वक्तव्यावर टीका होत आहे.

February 15, 2025 3:26 PM February 15, 2025 3:26 PM

views 47

लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन

बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे.   ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल,आणि य...

December 13, 2024 7:40 PM December 13, 2024 7:40 PM

views 15

बीडमध्ये शिक्षकाच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप

बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

October 11, 2024 8:35 PM October 11, 2024 8:35 PM

views 12

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट टोळ्यांचं जाळं उघडकीस

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, मुंबई विभागानं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट टोळ्यांचं जाळं उघडकीला आणलं. या कारवाईत ७६० कोटी रुपयांच्या खोट्या इन्व्हॉइसद्वारे १४० कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दावे केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

September 8, 2024 2:17 PM September 8, 2024 2:17 PM

views 7

मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. अटक केलेल...

July 18, 2024 10:35 AM July 18, 2024 10:35 AM

views 17

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, 779 मोबाइल सिमकार्डसह 23 मोबाइल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केले.     ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करू...

June 17, 2024 6:49 PM June 17, 2024 6:49 PM

views 16

लातूर : अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागानं लातूर-तुळजापूर मार्गावरच्या  बेलकुंड इथून एका तरुणाला अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केलं असून त्याच्याविरोधात भारतीय हत्या कायद्या अंतर्गंत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या युवकाला याआधी एका गुन्ह्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली असून तो जामिनावर बाहेर आला होता.