October 26, 2025 9:01 AM October 26, 2025 9:01 AM

views 49

पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचाऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं 9 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 236 धावा केल्या. भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 धावांची भागीदारीच्या जोरावर भारतानं 11 षटकं आणि 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. रोहितनं 121 तर मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं 74 धावा केल्या. आता दोन्ही संघांदरम्यान येत्या 29 ऑक्टोबरपासून कॅनबेरा ...

October 12, 2025 1:50 PM October 12, 2025 1:50 PM

views 225

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री, कोलंबो इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.