February 2, 2025 8:10 PM

views 29

Women’s U19 T20 World Cup: महिला क्रिकेटमध्ये, 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतपद

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.   भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. विजयासाठी ८३ धावांचं लक्ष्या भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं. गोंगदी त्रिशा...

February 2, 2025 8:09 PM

views 31

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

February 1, 2025 7:55 PM

views 16

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामान्यात मुंबईनं मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ ८६ धावात गारद केल्यानंतर ७ बाद ६७१ धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयाचा दुसरा डाव आज १२९ धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दुल ठाकुरनं दोन्ही डावात मिळून ८ गडी बाद केले. पहिल्या डावात त्यानं ८४ धावांचं योगदानही दिलं होतं. तो या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

January 31, 2025 8:21 PM

views 30

रणजी करंडक : मेघालयविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या ७ बाद ६७१ धावा

मुंबईत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत मेघालयाची दाणादाण उडवली. मेघालयाचा पहिला डाव काल पहिल्या दिवशी ८६ धावांवर संपल्यानंतर मुंबईनं आज ७ बाद ६७१ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाडनं १४५, आकाश आनंदनं १०३, शम्स मुलानीनं नाबाद १०० धावा केल्या. मेघालयानं आज दिवसअखेर दोन गडी गमावून २७ धावा केल्या.   रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर इथं सुरु असलेल्या, सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र त्रिपुरापेक्षा ३५ धावांनी पिछाडीवर राहिला. त्रिपुरानं पहिल...

January 30, 2025 8:06 PM

views 23

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची सामन्यावर मजबूत पकड

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरु झालेल्या मेघालयाविरुद्धच्या सामन्यावर मुंबईनं पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकून मेघालयाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि ८६ धावात त्यांचा पहिला डाव गुंडाळला. शार्दुल ठाकुरनं ४, मोहित अवस्थीनं ३, सिल्वेस्टर डिसुझानं २, तर शम्स मुलाणीनं १ गडी बाद केला.   त्यानंतर, मुंबईनं पहिल्या डावात दिवसअखेर २ बाद २१३ धावा करत १२७ धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सिद्धेश लाड ८९, तर कर्णधार अजिंक्य राहणे ८३ धावांवर खेळत होता....

January 29, 2025 10:27 AM

views 19

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शाह मैदानावर झालेल्या तिसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.

January 27, 2025 7:19 PM

views 507

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.   पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमधे अर्शदीप सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. जसप्रीत बुमराने गेल्या वर्षभरात १३ कसोटी सामन्यात ३५७ षटकात ७१ बळी मिळवले. भेदक यार्करचा मारा आणि सातत्यपूर्ण खेळ ही त्याच्या यंदाच्या कामगिरीची वैशिष्ट्...

January 24, 2025 10:37 AM

views 30

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या वीस षटकांचा सामना

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या संघांमध्ये उद्या वीस षटकांचा सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालचा भारताचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य असा आघाडीवर आहे.

January 23, 2025 8:08 PM

views 11

रणजीमध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संघाचे सामने सुरू

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं सुरु झालेल्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात दिवसअखेर ७ गडी गमावून २५८ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सौरभ नवले ६०, तर रजनीश गुरबानी २२ धावांवर खेळत होता. सिद्धेश वीरनं ४८, तर यश क्षीरसागरनं ३० धावा केल्या. बडोद्यातर्फे अतित शेठनं ३, तर राज लिंबानीनं २ बळी मिळवले. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातल्या शरद पवार क्रिकेट अकादमीत आज सुरु झालेल्या सामन्यात दिवसअखेर जम्मू-कश्मीरनं पहिल्या डावात मुंबईवर ५४ धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाज...

January 23, 2025 9:55 AM

views 8

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा विजय

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या, भारतानं हे लक्ष्य तेराव्या षटकातच तीन गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला, त्यानं केवळ 20 चेंडूत पन्नास धावा ठोकल्या. दुसरा सामना चेन्नई इथं शनिवारी होणार आहे.