February 10, 2025 1:54 PM February 10, 2025 1:54 PM

views 18

भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

  भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.   कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ६० धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरनं ४४ आणि अक्सर पटेलनं नाबाद ४१ धावा केल्या.   त्याआधी इंग्लंडचा डाव सामन्यात...

February 9, 2025 7:12 PM February 9, 2025 7:12 PM

views 7

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान

कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    इंग्लंडनं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामन्यातला शेवटचा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला. मात्र त्यांनी ३०४ धावा केल्या. फिल्सोल्ट आणि बेेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली.    ज्यो रुटनं ६९, तर बेेन डकेटनं ६५, धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं ४१, तर हॅरी ग्रोथनं ३१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ३ गडी बाद...

February 9, 2025 1:32 PM February 9, 2025 1:32 PM

views 28

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटक मधे बाराबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत १-० नं आघाडीवर आहे.

February 7, 2025 8:55 AM February 7, 2025 8:55 AM

views 13

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे.

February 2, 2025 8:10 PM February 2, 2025 8:10 PM

views 14

Women’s U19 T20 World Cup: महिला क्रिकेटमध्ये, 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतपद

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.   भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. विजयासाठी ८३ धावांचं लक्ष्या भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं. गोंगदी त्रिशा...

February 2, 2025 8:09 PM February 2, 2025 8:09 PM

views 19

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

February 1, 2025 7:55 PM February 1, 2025 7:55 PM

views 13

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामान्यात मुंबईनं मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ ८६ धावात गारद केल्यानंतर ७ बाद ६७१ धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयाचा दुसरा डाव आज १२९ धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दुल ठाकुरनं दोन्ही डावात मिळून ८ गडी बाद केले. पहिल्या डावात त्यानं ८४ धावांचं योगदानही दिलं होतं. तो या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

January 31, 2025 8:21 PM January 31, 2025 8:21 PM

views 19

रणजी करंडक : मेघालयविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या ७ बाद ६७१ धावा

मुंबईत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत मेघालयाची दाणादाण उडवली. मेघालयाचा पहिला डाव काल पहिल्या दिवशी ८६ धावांवर संपल्यानंतर मुंबईनं आज ७ बाद ६७१ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाडनं १४५, आकाश आनंदनं १०३, शम्स मुलानीनं नाबाद १०० धावा केल्या. मेघालयानं आज दिवसअखेर दोन गडी गमावून २७ धावा केल्या.   रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर इथं सुरु असलेल्या, सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र त्रिपुरापेक्षा ३५ धावांनी पिछाडीवर राहिला. त्रिपुरानं पहिल...

January 30, 2025 8:06 PM January 30, 2025 8:06 PM

views 14

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची सामन्यावर मजबूत पकड

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरु झालेल्या मेघालयाविरुद्धच्या सामन्यावर मुंबईनं पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकून मेघालयाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि ८६ धावात त्यांचा पहिला डाव गुंडाळला. शार्दुल ठाकुरनं ४, मोहित अवस्थीनं ३, सिल्वेस्टर डिसुझानं २, तर शम्स मुलाणीनं १ गडी बाद केला.   त्यानंतर, मुंबईनं पहिल्या डावात दिवसअखेर २ बाद २१३ धावा करत १२७ धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सिद्धेश लाड ८९, तर कर्णधार अजिंक्य राहणे ८३ धावांवर खेळत होता....

January 29, 2025 10:27 AM January 29, 2025 10:27 AM

views 11

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शाह मैदानावर झालेल्या तिसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.