May 9, 2025 8:04 PM May 9, 2025 8:04 PM

views 15

महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे तिरंगी एकदिवसीय मालिकेत, आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय मिळवला.    दक्षिण अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या. ॲनेरी डेर्क्सननं १०४, तर क्लोई ट्रायॉननं ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं ५ बळी घेतले. विजयासाठी ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४३ व्य़ा षटकातच २३९ धावांवर आटोपला.   चामरी अटापट्टुच्या ५१ आणि अनुष्का संजीवनीच्या नाबाद ४३ धावा वगळता श्रीलंकेच्या फलं...

April 28, 2025 1:01 PM April 28, 2025 1:01 PM

views 6

IPL: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत

आयपीएल क्रिकेटमध्ये आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.   मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्स संघानं ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ १६१ धावाच करू शकला.   कालच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १६३ धावांचं आव्हान रॉयल चॅलें...

April 25, 2025 3:00 PM April 25, 2025 3:00 PM

views 19

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान आजचा सामना

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान होणार आहे.चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरु होईल.    बेंगळुरू इथे झालेल्या कालच्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला.

April 12, 2025 1:13 PM April 12, 2025 1:13 PM

views 8

IPL:- क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार असून संध्याकाळी सनराइजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ  आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.    दरम्यान, काल संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट  राईडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्यानं चेन्नईला सहज नमवत  विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई...

April 10, 2025 2:42 PM April 10, 2025 2:42 PM

views 15

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्समधे आजचा सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स सलग तीन सामने जिंकत सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु चौथ्या स्थानी आहे.   दरम्यान कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, २१८ धावांचा पाठलाग क...

April 10, 2025 1:06 PM April 10, 2025 1:06 PM

views 16

अमेरिकेतील २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने काल याची घोषणा केली.   ऑलिंपिकमध्ये २० षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी १५ खेळाडू खेळवू शकणार आहे. मात्र, अद्याप यासाठी स्टेडियमच्या नावांची यादी ठरवण्यात आलेली नाही.

March 22, 2025 2:41 PM March 22, 2025 2:41 PM

views 10

१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून  असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८वा हंगाम आहे.

March 8, 2025 3:10 PM March 8, 2025 3:10 PM

views 12

IPL : गुजरात जायंटस संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून पराभव

महिला प्रीमियर लीग क्रिकेट मध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १७८ धावांचं आव्हान गुजरात जायंटसनं ३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.  या विजयामुळे  गुजरात जायंट्स संघ ७ सामन्यांतून ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात ८ सामन्यातून मिळालेले १० गुण आहेत. या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे .

March 2, 2025 8:11 PM March 2, 2025 8:11 PM

views 12

विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी

विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली.  आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा झाल्या असताना, दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली.   या सामन्यात पहिल्या डावात १५३, आणि दुसऱ्या डावात ७३ धावांची खेळी केलेल्या विदर्भच्या दानीश...

March 1, 2025 3:37 PM March 1, 2025 3:37 PM

views 17

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला, तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते.