October 14, 2025 1:28 PM October 14, 2025 1:28 PM

views 216

वेस्ट- इंडीज विरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारत विजयी

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने ७ गडी राखून जिंकला असून ही   मालिकाही २-० अशी  जिंकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ  सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती.   ३ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने १२१ धावा केल्या.  वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला,  तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.

October 13, 2025 8:14 PM October 13, 2025 8:14 PM

views 35

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्पबेलनं ११५, तर शाई होपनं १०३ धावा केल्या. ३९० धावांवर त्यांचा डाव संपला. &nb...

October 12, 2025 7:23 PM October 12, 2025 7:23 PM

views 160

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा  संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे.    आज सकाळी तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा पाहुण्या संघानं कालच्या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ गडगडल्यानं जेवणाच्या विश्रांतीपूर्वी   त्यांना फॉलोऑन मिळाला. त्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडिज संघाची अडखळत सुरुवात झाली. चहाप...

October 5, 2025 6:31 PM October 5, 2025 6:31 PM

views 109

विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावलं ‘इराणी चषक’

प्रथम वर्ग क्रिकेट मध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत, विदर्भानं आज शेष भारत संघाचा ९३ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात, अथर्व तायडेच्या १४३ आणि यश राठोडच्या ९१ धावांच्या जोरावर ३४२ धावा केल्या, तर शेष भारताचा डाव २१४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भानं २३२ धावा केल्या. त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३६० धावांची झाली. त्यानंतर,  शेष भारताचा दुसरा डाव २६७ धावात गुंडाळला. हर्ष दुबेनं...

October 3, 2025 3:21 PM October 3, 2025 3:21 PM

views 285

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची आघाडी

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने  १७८ धावांची आघाडी घेतली आहे. अहमदाबादमधे सुरु असलेल्या या  सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. दिवस अखेर भारताच्या  २ बाद १२१ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुलनं दमदार फलंदाजी करत शतक पूर्ण केलं. मात्र, जस्टीन ग्रीव्हज्‌च्या चेंडूवर तो झेलबाद झाला. शुभमन गिल देखील अर्धशतक करून बाद झाला.

October 2, 2025 6:12 PM October 2, 2025 6:12 PM

views 54

भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या.   अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. जस्टीन ग्रीव्हच्या ३२ धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सामन्यातले ३५ चेंडू बाकी असताना १६२ धावांवर त्यांचा डाव आटोपला. भारतातर्फे मोहंमद सिराजनं ४, जसप्र...

September 22, 2025 10:27 AM September 22, 2025 10:27 AM

views 17

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

September 20, 2025 3:43 PM September 20, 2025 3:43 PM

views 21

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला.   अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन्यांमध्ये तर श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ६३ सामन्यांमध्ये १०० बळींचा विक्रम केला आहे. अर्शदीप हा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 100 बळी घेणारा जगातला तिसरा सर्वात जलद गोलंदाज ठरला आहे.

September 17, 2025 2:50 PM September 17, 2025 2:50 PM

views 17

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.   भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असल्यानं ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भा...

September 15, 2025 10:19 AM September 15, 2025 10:19 AM

views 29

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.   ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित करत असून पेहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं  कर्णधार सुर्यकुमार य...