June 30, 2024 8:41 PM

views 22

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं टी २०मध्ये एकूण ७४ सामन्यात ५१५ धावा केल्या असून गोलंदाजीत ७४ बळीही घेतले आहेत.  

June 26, 2024 11:10 AM

views 30

टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 वाजता त्रिनिदादमध्ये तारौबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 वाजता होणार आहे. अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन इथं खेळला जाईल.

June 24, 2024 1:04 PM

views 20

भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून केला पराभव

बंगळुरू इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. अव्वल फिरकीपटू अष्टपैलू दीप्ती शर्मानं 27 धावांत दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 215 धावांपर्यंत रोखले आणि त्यानंतर भरात असलेल्या स्मृती मांधानानं केवळ 83 चेंडूत 90 धावा करून, संघाला तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ...

June 21, 2024 9:24 AM

views 32

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एटमधील सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १३४ धावाच करू शकला. २८ चेंडूत ५३ धावा करणारा भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.

June 19, 2024 7:47 PM

views 61

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ षटकात तीन बळींच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या होत्या.  

June 19, 2024 2:50 PM

views 30

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ फेरीचे सामने रंगणार

आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ संघांमधले सामने सुरू होणार आहेत. हे सर्व सामने वेस्ट इंडिज मध्ये खेळले जाणार आहे. यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान खेळला जाणार आहे. सुपर आठ फेरीतला भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तान बरोबर होणार आहे. बांगलादेशने सर्वात शेवटी नेपाळवर विजय मिळवून सुपर आठ मधे प्रवेश केला आहे.

June 15, 2024 2:32 PM

views 34

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा कॅनडासोबत सामना

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल. काल वेस्ट इंडिजच्या लॉडरहिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या धावगतीच्या जोरावर  अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या संघांनं पदार...

June 14, 2024 2:39 PM

views 44

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं ९७ धावाचं आव्हानं अफगाणिस्ताननं तीन गडी गमावून पूर्ण केलं. काल झालेल्या सामन्यात इंग्लडनं ओमानला ८ गडी राखून हरवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमान संघाला इंग्लडनं केवळ ४७ धावांमध्येच गुंडाळलं. विजयासाठीचं ४८ धावांच माफक आव्हान इंग्लडनं केवळ ३ षटकात दोन गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  

June 14, 2024 2:23 PM

views 32

क्रिकेट मॅच आणि लोकसभा निडवणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

आयपीएल क्रिकेट सामन्यांचं अनधिकृत प्रसारण केल्याबद्दल तसंच क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने अर्थात इडीनं काल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर छापे टाकले. या छाप्यात इडीनं रोख रक्कम, महागडी घड्याळं आणि डिमॅट खाती असे एकूण ८ कोटी रुपये जप्त केले आहेत.