August 7, 2024 8:30 PM

views 12

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान

श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं ९६ धावा केल्या. कुशल मेंडिस ५९, तर पथुम निशंकानं ४५ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रियान परागनं ३ गडी बाद केले.  

August 5, 2024 12:12 PM

views 25

पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेची भारतावर मात

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 241 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 208 धावाच करु शकला. श्रीलंकेच्या जेफ्री व्हॅडरसनने भारताचे प्रमुख सहा गडी बाद केले.

August 2, 2024 11:14 AM

views 19

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलंबोमध्ये होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या २० षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजतासामना सुरू होईल.

July 30, 2024 11:24 AM

views 17

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा आज तिसरा क्रिकेट सामना

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी श्रीलंकेतल्या पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे.   भारतीय संघानं आधीचे दोन सामने जिंकून आघाडी घेतली असल्यानं भारतानं या मालिकेचं विजेतेपद याआधीच निश्चित केलं आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

July 27, 2024 8:19 PM

views 20

भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि श्रीलंके दरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळत आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या  १३ षटकांत २ बाद १४६ धावा झाल्या होत्या. सुर्यकुमार यादवं या सामन्यात अर्धशतक केलं.

July 19, 2024 12:12 PM

views 26

श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार

श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे.   दोन्ही मालिकांमध्ये शुभमन गील संघाचा उपकर्णधार असेल. 20 षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे , अक्षर पटेल, वॉश...

July 14, 2024 3:36 PM

views 15

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय

क्रिकेटमध्ये बर्मिंघम इथं झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातले दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.   पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५६ धावा केल्या. भारताने फक्त १९ षटकांत १५९ धावा करत सामना जिंकला.   युवराज सिंह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून अंबाती रायडू, गुरकिरत सिंह, युसूफ पठाण यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

July 10, 2024 10:55 AM

views 19

गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे काल ही घोषणा केली. भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती; त्यांच्या जागी आता गौतम गंभीर यांची निवड झाली आहे.

July 6, 2024 2:58 PM

views 18

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे क्रिकेट सामना आज हरारे इथं होणार

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल...

July 1, 2024 1:32 PM

views 28

T-२० विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बी.सी.सी.आय कडून, १२५ कोटी रुपयांची बक्षीसं जाहीर

टी-२० विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री बार्बाडोस मधील भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदान केलं आणि ही घोषणा केली.